रामपुरी , ग्रामपंचायत ही चंद्रपूर जिल्हा परिषद, ब्रम्हपुरी पंचायत समिती अंतर्गत येणारी एक ग्रामिण स्वराज्य संस्था आहे. गावाची लोकसंख्या 1909 असून महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात वसलेले एक महत्त्वपूर्ण गाव आहे. हे गाव रामपुरी ग्रामपंचायतीचे मुख्यालय आहे, ज्यामध्ये रामपुरी , नवेगाव ख , शिवसागर तुकूम , आणि परसोडी या गावांचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १२० किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव आदिवासीबहुल भागातील विकास आणि प्रशासनाचे एक केंद्र आहे. रामपुरी हे गाव महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यात ब्राम्हपुरी तालुक्यातील एक गाव आहे. हे जिल्हा मुख्यालय चंद्रपूर पासून सुमारे १२० किमी अंतरावर आणि तालुका मुख्यालय ब्रम्हपुरी पासून सुमारे २० -22 किमी अंतरावर आहे. प्रशासकीय दृष्ट्या रामपुरी ग्रामपंचायत केंद्र आहे. पोस्टल सेवा: रामपुरी गावाचा पिन कोड ४४१२०६ आहे. या गावासाठीची पोस्टल सेवा मेंडकी सब ऑफिस (S.O.) द्वारे पुरवली जाते. जवळची गावे: या गावाच्या आसपासची काही महत्त्वाची गावे मेंडकी , नवेगाव ख , शिवसागर तुकूम , परसोडी , आहेत. जवळची मोठी शहरे: रामपुरी गावापासून ब्रम्हपुरी , आरमोरी , चंद्रपूर आणि नागपूर ही मोठी शहरे जवळ आहेत.
येथील जीवनशैली अत्यंत सादगीपूर्ण असून लोक निसर्गाच्या सानिध्यात साधे आणि सरळ जीवन जगतात. त्यांची जीवनपद्धती कमी गरजांवर आधारित आहे आणि शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याने अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीवर अवलंबून आहे. या भागात SC, ST आणि OBC समाजातील लोक एकत्रितपणे राहतात व महापुरुषांच्या जयंतीसारखे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सामूहिकपणे साजरे करतात. घरांची रचना प्रामुख्याने नैसर्गिक साधनांपासून – लाकूड, बांबू, गवत व माती – तयार केलेली असते, तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेक पक्की घरेही उभारण्यात आली आहेत. सामाजिक जीवनात एकोपा आणि सामुदायिक भावना प्रकर्षाने जाणवते, कारण आसपासच्या गावांतील लोक एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहतात. शासनाच्या प्रयत्नांमुळे आणि वाढत्या जागृतीमुळे शिक्षणाचे प्रमाण हळूहळू वाढत आहे, तर आरोग्य सुविधा काही प्रमाणात मर्यादित असल्यामुळे अनेकजण पारंपरिक उपचारांवर अवलंबून राहतात. बैलपोळा, दिवाळी, होळी यांसारखे सण आनंद व उत्साहाने साजरे केले जातात, ज्यातून स्थानिक संस्कृतीची समृद्ध परंपरा प्रतिबिंबित होते.
सरपंच
उपसरपंच
8806313855
ग्रामपंचायत अधिकारी
कुटुंबांची संख्या
लोकसंख्या
पुरुष
महिला
रामपुरीग्रामपंचायत द्वारे पुरवल्या जाणाऱ्या उत्कृष्ट सुविधा
जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली असून, गावाला पाणी पुरविले जाते.
ग्रामपंचायत हद्दीत घनकचरा व्यवस्थापन करणे कामी ग्रामपंचायतीने प्रत्येक कुटुंबांना वैयक्तिक कचराकुंडी वाटप केले आहेत. व ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक जागे ठिकाणी ओला व सुका कचरा संकलन होणे कामी सार्वजनिक मोठी कचराकुंडी देखील ठेवण्यात आली आहे. ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण होऊन डंपिंग ग्राउंडवर व्यवस्थापन करण्याचे नियोजन केलेले आहे
ग्रामपंचायतीचे सर्व मुख्य रस्ते डांबरी असून गावाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.
स्मशानभूमी पक्क्या रस्त्याने जोडलेली असून सोलर पथदिव्यांची सुविधा उपलब्ध आहे.
गावातील शाळा संगणक, प्रॉजेक्टर आणि Wi-Fi सुविधांसह डिजिटल बनविल्या आहेत.
ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व रस्त्यांवर एलईडी पथदिवे बसविण्यात आले आहेत.
गावातील सांडपाणी निचरा करण्यासाठी पक्क्या गटारींची सोय करण्यात आलेली आहे.
संपूर्ण गाव सीसीटीव्ही निगराणीखाली असून नागरिकांची सुरक्षितता वाढली आहे.
महाराष्ट्र शासन आणि ग्रामीण विकास विभाग
माननीय मुख्यमंत्री
Hon'ble Chief Minister
महाराष्ट्र शासन
माननीय उपमुख्यमंत्री
Hon'ble Deputy Chief Minister
महाराष्ट्र शासन
माननीय उपमुख्यमंत्री
Hon'ble Deputy Chief Minister
महाराष्ट्र शासन
माननीय मंत्री
Hon'ble Minister
ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग
माननीय राज्यमंत्री
Hon'ble Minister of State
ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग
प्रमुख सचिव
Principal Secretary
ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग
जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी
District Collector & Magistrate
चंद्रपूर जिल्हा
आदिवासी विकास मंत्री
Hon. Minister of Tribal Development
चंद्रपूर जिल्हा